IPL 2026: मुंबई इंडियन्सचा दिल्लीतही दरारा? दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध आज राजधानीत सामना; कशी असेल संभावित Playing XI

MI vs DC: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रोमांचक IPL सामन्याची सविस्तर माहिती. रोहित शर्मा, बुमराह आणि दिल्लीच्या फलंदाजीची मोठी कसोटी. मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास वाढलेला असून दिल्ली कॅपिटल्ससमोर कठीण आव्हान उभे राहणार आहे.
IPL 2026

IPL 2026

esakal

Updated on

नवी दिल्ली : पहिला सामना एकतर्फी जिंकल्यानंतर सहाव्या दिवशी मुंबई इंडियन्सचा संघ आज मैदानात उतरत आहे. सलामीला दाखवलेला दरारा आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दाखवण्याची तयारी मुंबईने केली आहे. १४ वर्षांनी सलामीचा सामना जिंकण्याचा पराक्रम केल्यामुळे मुंबई संघाचा आत्मविश्वास उंचावलेला. रोहित शर्माला मिळालेला सूर पूर्ण संघाचे मनोबल वाढवत आहे त्यामुळे उद्याच्या सामन्यात मुंबई संघाचे पारडे निश्चितच जड आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com