Delhi Capitals vs Royal Challengers Bengaluru | WPL 2025Sakal
Cricket
WPL 2025: दिल्ली कॅपिटल्स प्ले-ऑफमध्ये दाखल! RCB चा मात्र घरच्या मैदानावर भोपळा
DC vs RCB: दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दणदणीत विजय मिळवत वूमन्स प्रीमियर लीग २०२५ प्लेऑफमधील प्रवेश पक्का केला आहे. शफाली वर्मा आणि जेस जोनासनने यांनी दिल्लीसाठी विक्रमी भागीदारीही केली.
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी (१ मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एम चिन्नास्वामी स्टेडियवर ९ विकेट्सने पराभूत केले. दिल्लीचा हा ७ सामन्यांतील पाचवा विजय होता. त्यामुळे दिल्लीने सलग तिसऱ्या वर्षी प्ले-ऑफमधील स्थान पक्के केले आहे.
बंगळुरूचा हा घरच्या मैदानावरील सलग चौथा पराभव आहे. त्यांनी या मैदानात यंदा चार सामने खेळले, या चारही सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला. गतविजेत्या बंगळुरूला आत्तापर्यंत यंदाच्या हंगामात खेळलेल्या ६ पैकी ४ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे, तर २ सामने त्यांनी जिंकले आहेत.
दरम्यान, बंगळुरूला झालेला हा तिसऱ्या WPL हंगामातील अखेरचा सामना होता. आता पुढील सामने लखनौला होणार आहेत.