

Dinesh Karthik Angry at Umpire | RCB vs CSK | IPL 2026
Sakal
RCB vs CSK Marathi News: रविवारी (५ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १९ व्या हंगामात ४३ धावांनी पराभूत केले. हा सामना बंगळुरुच्या घरच्या मैदानात म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला होता.
हा सामना बंगळुरूने जिंकला असला, तरी या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये बंगळुरूचा फलंदाजी प्रशिक्षक आणि मेंटॉर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) अंपायर्सवर चिडलेला दिसत आहे.