

Fans Video Viral | RCB vs CSK | IPL 2026
Sakal
RCB vs CSK Marathi News: चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील लोकप्रिय संघांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्यातील सामने नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यातही दोन्ही संघांचा चाहतावर्गही मोठा असल्याने दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये बऱ्याचदा जुगलबंदी रंगते. कधी स्टेडियममध्ये, तर कधी सोशल मीडियावर यो दोन्ही संघांचे चाहते आमने-सामने येतात.
दरम्यान, नुकताच १९ व्या हंगामाच चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रविवारी (५ एप्रिल) सामना पार पडला. या सामन्यात बंगळुरूने चेन्नईला ४३ धावांनी पराभूत केलं. बंगळुरून चेन्नईला सलग चौथ्यांदा पराभूत केलं आहे.