South Africa beat Afghanistan in double Super Over T20 World Cup
ESAKAL
T20 World Cup Afghanistan vs South Africa Marathi News : अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या लढतीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जीवंतपणा आणला. आफ्रिकेच्या १८७ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने शेवटच्या षटकापर्यंत मॅच नेली. पण, विजयी धाव घेताना फझलहक फारूकी रन आऊट झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. कागिसो रबाडासारख्या अनुभवी गोलंदाजाने २०व्या षटकात दोन नो बॉल व एक व्हाईड बॉल टाकून अफगाणिस्तानला मॅच आणून दिली होती. पण, शेवटी एक धाव कमी पडली. सुपर ओव्हरमध्ये आफ्रिकेच्या त्रिस्तान स्तब्सने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून सामना बरोबरीत आणला आणि दुसरा सुपर ओव्हरचा सामना रंगला.