
Champions Trophy 2025: पाकिस्तान आणि युएईमध्ये १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी आता साधारण एक महिनाच राहिला आहे. अशाच सर्व संघ त्यादृष्टीनेही तयारी करत आहे.
पण याचदरम्यान, एक मोठा तणाव निर्माण झाला होता, तो असा की इंग्लंड या स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार की नाही, हे निश्चित होत नव्हते. मात्र, आता यावर तोडगा निघाला आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार इंग्लंडमधील जवळपास १६० राजकारणी नेत्यांनी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडे (ECB) एक विनंती अर्ज पाठवला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा.
विनंती अर्ज करणाऱ्या राजकारण्यांमध्ये निगेल फॅरेज, जेरेमी कब्रायन आणि लॉर्ड किनॉक अशा नावाजलेल्या नेत्यांचाही समावेश आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता असून त्यांच्याकडून महिलांवर जो अत्याचार होत आहे आणि त्यांना खेळांमध्ये सहभागी होण्यास असलेली बंदी या निषेधार्थ राजकारण्यांनी ECB कडे ही विनंती केली होती.
साल २०२१ मध्ये तालिबान सत्तेत आल्यापासून त्यांनी महिलांना खेळापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधून यासाठी जोरदार विरोध झाला. इंग्लंड याच कारणाने अफगाणिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिकाही खेळत नाही. पण आता इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये २६ फेब्रुवारीला लाहोरला अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू नये असाही आवाज इंग्लंडमध्ये उठवण्यात आला होता.
मात्र, आता ECB ने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानच्या सामन्यावर बहिष्कार न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ECB चे प्रमुख रिचर्ज गौल्ड यांनी सांगितले की द्विपक्षीय मालिकांबाबत पॉलिसी कायम राहिल. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयसीसीची स्पर्धा असल्याने त्यात अफगाणिस्तानविरुद्ध इंग्लंड खेळेल.
गौल्ड यांनी पत्रात लिहिले आहे की 'ECB अफगाणिस्तानच्या राजवटीत महिला आणि मुलींना दिल्या जाणाऱ्या वागणूकीचा तीव्र विरोध करत आहे. आयसीसीच्या संविधानात सर्व सदस्यांनी महिला क्रिकेटच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध असायला हवे. याचच वचनबद्धतेनुसार ECB अफगाणिस्तानविरुद्ध कोणत्याही प्रकारचे द्विपक्षीय क्रिकेट सामने खेळत नाही.'
त्यांनी पुढे असंही म्हटलंय की याबाबत आयसीसीमध्ये कारवाईसाठी एकमत नसले तरी इंग्लंडकडून उपाय योजनांसाठी सक्रियपणे समर्थन करत राहिल. कोणत्याही एका बोर्डापेक्षा आयसीसीने उचललेलं पाऊल प्रभावी ठरेल.
याशिवाय त्यांनी असंही म्हटलंय की क्रिकेट अफगाणिस्तानमध्ये सकारात्मकता आणि आशा देणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे. त्यामुळे ECB अफगाणिस्तानच्या महिलांच्या हक्कासाठी तोगडा काढण्याचा प्रयत्न करेल. याबाबत ते युकेच्या सरकारच्याही संपर्कात राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.