How can Afghanistan qualify for Super 8 after losing to South Africa
esakal
What Afghanistan need to reach Super 8 stage? अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज थरारक सामन्याचा अनुभव आला. T20 World Cup मधील लढतीत दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानवर विजय मिळवला. आफ्रिकेच्या १८८ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने विजय मिळवलाच होता, परंतु ते एक धावेने कमी पडले आणि सामना १८७-१८७ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये त्रिस्तान स्तब्सच्या षटकाराने आफ्रिकेला १७-१७ अशी बरोबरी मिळवून दिली. पण, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये आफ्रिकेने २४ धावांचे लक्ष्य ठेवले आणि अफगाणिस्तानला १९ धावांवरच समाधान मानायला भाग पाडले.