Sanju Samson and Abhishek Sharma to open for India in T20 World Cup 2026
esakal
Team India probable Playing XI T20I World Cup 2026: भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यामाने पुढल्या वर्षी ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. उप कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) याला डावल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, संघहितासाठी असे निर्णय घ्यावे लागतात, हे कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत जाहीर केले. याशिवाय देशांतर्गत स्पर्धा गाजवणाऱ्या इशान किशनला ( Ishan Kishan) त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं. रिंकू सिंगही संघात परतल्याने आता टीम इंडिया एकदम भारी वाटत आहे.