
गुरुवारपासून (२३ जानेवारी) रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून यामध्ये महाराष्ट्राचा पहिला सामना बडोद्याविरुद्ध नाशिकमध्ये सुरू आहे.
या सामन्यात महाराष्ट्राचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे. त्याने या सामन्यात चांगले नेतृत्व केले आहे. याच सामन्यादरम्यान एक अनोखे दृश्यही पाहायला मिळाले. एक चाहता मैदानाची सुरक्षा भेदत थेट आत घुसला होता.