KKR vs MI: 'माहित नाही मैदानात काय सुरूये, संपूर्ण सिजनमध्येच आम्ही...', हार्दिक पांड्या मुंबईच्या पराभवानंतर संतापला

Hardik Pandya on MI's loss against KKR: मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध बुधवारी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्रतिक्रिया देताना कुठे चूक झाली, हे सांगितले आहे.
Hardik Pandya on MI's loss against KKR:

Hardik Pandya on MI's loss against KKR:

Sakal

Updated on

IPL 2026, KKR vs MI: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पुन्हा एकदा मोठ्या पराभवाला बुधवारी (२० मे) सामोरे जावे लागले. बुधवारी मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) ४ विकेट्सने पराभूत करत स्पर्धेतील आव्हानही कायम ठेवले आहे.

मात्र मुंबईचा हा १३ सामन्यांतील ९ वा पराभव होता. मुंबईला यंदा सुरुवातीपासूनच लय मिळालेली नाही. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) निराश दिसला, त्यातही क्षेत्ररक्षणावर अधिक निराश दिला.

Hardik Pandya on MI's loss against KKR:
IPL 2026 KKR Playoff Scenario: कोलकाता नाइट रायडर्सने विजय मिळवला, पण अजूनही लक्ष्य दूरच; Mumbai Indians, लखनौच्या हाती सारी सूत्र; जाणून घ्या गणित
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com