

Hardik Pandya | KKR vs MI | IPL 2026
Sakal
IPL 2026 KKR vs MI news: कोलकाता नाईट रायडर्सने बुधवारी (२० मे) मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत ४ विकेट्सने पराभूत केले. मुंबई इंडियन्सचा हा ९ वा पराभव होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा आता एकच सामना बाकी असून ते आता पाँइंट्स टेबलमध्ये ९ व्या क्रमांकापेक्षा वर जाऊ शकणार नाहीत.
दरम्यान, या सामन्यानंतर आयपीएलकडून मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याकडून (Hardik Pandya) झालेल्या एका चूकीसाठी त्याला शिक्षा करण्यात आली आहे.