
इंग्लंडने काही दिवसांपूर्वीच वनडे आणि टी२० संघाच्या कर्णधारपदी २६ वर्षीय हॅरी ब्रुकची निवड केली आहे. जॉस बटलरने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर आता इंग्लंडने ही जबाबदारी हॅरी ब्रुककडे दिली. कर्णधार झाल्यानंतर पहिल्यांदाच हॅरी ब्रुकची प्रतिक्रिया समोर आली आहे.
हॅरी ब्रुकने काही महिन्यांपूर्वी आयपीएल २०२५ स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याने सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.