

Stephen Fleming | MS Dhoni | CSK
Sakal
CSK coach change IPL 2027: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील सर्वात यशस्वी प्रशिक्षक म्हणून चेन्नई सुपर किंग्सच्या स्टीफन फ्लेमिंग यांचे नाव घेतले जाते. तब्बल १५ हंगामात फ्लेमिंग यांनी चेन्नईच्या संघाला मार्गदर्शन करताना ५ वेळा विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
मात्र असे असतानाच आपल्या सर्वात भरवशाच्या प्रशिक्षकापासून मार्ग वेगळा करण्याचा कठीण निर्णय चेन्नई सुपर किंग्सने घेतला आहे. फ्लेमिंग चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार झाले आहेत. त्यामुळे आता चेन्नईला नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध घ्यावा लागणार आहे, यासाठी एक नाव सध्या चर्चेत आहे.