

Zaheer Khan | CSK Head Coach
Sakal
Zaheer Khan As Chennai Super Kings' Head Coach: चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी (२१ सप्टेंबर) नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. १६ वर्षांचा विश्वासाचा प्रवास, ५ आयपीएल ट्रॉफी अन् एक सुवर्णकाळ रचणाऱ्या स्टीफन फ्लेमिंग यांच्या निरोपानंतर चेन्नई सुपर किंग्स आज वेगळ्या वळणावर आहे.
काही महिन्यांपूर्वी फ्लेमिंग यांनी चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राजीनामा दिला होता. फ्लेमिंग यांनी एक मोठा आणि यशस्वी वारसा मागे सोडल्याने त्यांची जागा कोण घेणार, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. यासाठी अनेक मोठी नावं समोर आली होती. पण अखेर 'कॅप्टन कूल' एमएस धोनीचा जुना सहकारी आणि विश्वासू शिलेदार झहीर खानची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.