
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (९ मार्च) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकली आहे. दुबईला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ४ विकेट्सने पराभूत करत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. तीन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा हा भारत पहिला संघ आहे.
भारताच्या या विजयाचा आनंद देशभरात साजरा केला जात आहे. अशात महाराष्ट्र विधानसभेतही भारतीय संघाच्या यशचे कौतुक करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र विधानसभेत सोमवारी (१० मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आहे.
तसेच भारतीय संघातील खेळाडूंना अभिनंदनाचा ठराव प्रशस्तीपत्रकात्या माध्यमातून पाठवावा अशी विनंतीही त्यांनी केली.