ICC T20 World Cup Anthem : आयसीसीने टी 20 वर्ल्डकपचे नवे अँथम साँग केले प्रसिद्ध; ग्रॅमी पुरस्कार प्राप्त बाल्फेंची आहे निर्मिती

ICC
ICC T20 World Cup AnthemESAKAL

ICC T20 World Cup Anthem : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज टी 20 वर्ल्डकप 2024 चे नवे अँथम साँग प्रसिद्ध केलं. या गाण्याची निर्मिती ग्रॅमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध कम्पोजर लॉर्ने बाल्फे यांनी केली आहे. हे गाणं तीन मिनिटांच आहे. हे गाणं सर्वात प्रथम अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथे होत असलेल्या टी 20 वर्ल्डकपच्या पहिल्या युएसए विरूद्ध कॅनडा सामन्यात प्ले केलं जाणार आहे. हा सामना एक जूनला टेक्सास येथे होणार आहे.

ICC
Ambati Rayudu RCB : सीएसके आरसीबीला त्यांची एक ट्रॉफी देऊ शकते जेणेकरून ते... रायुडू असं का म्हणाला?

आयसीसी अँथम साँग प्रसिद्ध करताना म्हणते, 'ही संगिताची ऐतिहासिक धून आयसीसीच्या सर्व सामन्यात वाजवण्यात येणार आहे. या धूनमध्ये क्रिकेटच्या कसोटी, वनडे आणि टी 20 अशा सर्व फॉरमॅटचे स्पीरिट आहे. ही धून आयसीसीची जगभरातील ओळख अधोरेखित करते.'

लंडनमधील प्रख्यात ॲबे रोड रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेला हा अनोखा स्कोअर जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी एकात्म, श्रवणीय अनुभव म्हणून काम करेल. क्रिकेट संस्कृतीची समृद्ध टेपेस्ट्री साजरी करण्यासाठी हे अँथम डिझाइन केले गेले आहे, ज्यामुळे आयसीसी इव्हेंटच्या विविध प्लॅटफॉर्मवर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि प्रसारणावर चाहत्यांसाठी एक दृष्य अनुभव निर्माण केला गेला आहे.

ICC
Hardik Pandya Natasa Stankovic : नेमकं असं काय झालंय... हार्दिक अन् नताशाचा होणार घटस्फोट?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com