

India vs Pakistan
Sakal
ICC Warns Pakistan Over India Match Boycott: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा तोंडावर आली आहे. मात्र वाद संपत संपण्याचे नाव घेत नाहीयेत. पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय संघाला भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्यास सांगितले आहे.
रविवारी पाकिस्तान सरकारच्या (Pakistan Government) सोशल मिडिया अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आली होती की पाकिस्तान संघाला टी२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याची परवानगी आहे, पण त्यांनी भारताविरुद्ध १५ फेब्रुवारीला होणारा सामना खेळू नये. मात्र मागील कारण स्पष्ट करण्यात आले नव्हते.
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा (T20 World Cup 2026) भारत आणि श्रीलंकेमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पाकिस्तान सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहेत. मात्र आता पाकिस्तानने भारताविरूद्धचा (India vs Pakistan) सामना न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याने आता आयसीसीने यावर उत्तर दिले आहे.