

India vs Pakistan
Sakal
Pakistan to Boycotts T20 World Cup Match Against India: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणार होता.
पाकिस्तान सरकारने संघाला या स्पर्धेसाठी श्रीलंकेत जाण्यास परवानगी दिली आहे, मात्र भारताविरूद्धचा सामना न खेळण्यास सांगितले आहे.