K Srikkanth suggests Washington Sundar should open with Ishan Kishan instead of Sanju Samson
esakal
T20 World Cup India possible playing XI vs Namibia: भारत-नामिबिया सामन्यात अभिषेक शर्माचे ( Abhishek Sharma) खेळणे निश्चित नाही. पोटदुखीमुळे अभिषेकला हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले होते, काल त्याला सोडण्यात आले. पण, तो लगेच मैदानावर उतरेल याची शक्यता कमीच आहे. अशा वेळी अभिषेकच्या जागी संजू सॅमसनला ( Sanju Samson) सलामीसाठी इशान किशनसोबत संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, आता एक नविन समीकरण समोर आले आहे आणि अभिषेकच्या जागी सलामीवीर म्हणून नामिबियाविरुद्ध वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar) याला संधी द्यायला हवी, अशी मागणी होतेय.