ABHISHEK SHARMA FINALLY REVEALED THE MEANING BEHIND HIS VIRAL ‘L’ CELEBRATION
esakal
आशिया कप सुपर ४ मध्ये भारताने पाकिस्तानचा सहज पराभव करून अंतिम फेरीकडे वाटचाल केली.
अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ६ चौकार व ५ षटकारांसह ७४ धावांची वादळी खेळी केली.
शुभमन गिलसोबत त्याने पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भक्कम भागीदारी केली.
Abhishek Sharma reply to Suryakumar Yadav on celebration : अभिषेक शर्माने आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची मॅच गाजवली. शाहिन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार खेचून अभिषेकने त्याचे इरादे स्पष्ट केले. त्याने ३९ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ७४ धावांची वादळी खेळी करताना शुभमन गिलसोबत १०५ धावा जोडल्या. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अभिषेकने 'L' साईन दाखवणारं सेलिब्रेशन केलं अन् सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला याबद्दल विचारलं... अभिषेकने दिलेल्या उत्तराने पाकिस्तानला मिरची झोंबली.