IND vs PAK Final Live: जसप्रीत बुमराहने स्पेल संपवला, आता भारताची वाढणार डोकेदुखी? ८ फलंदाजांसह उतरलेत, कोण उचलणार 'डेथ ओव्हर'चा भार?

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: IND vs PAK आशिया चषक २०२५च्या फायनलमध्ये भारताचा गोलंदाजी विभाग चिंतेत आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेर राहिल्याने भारताकडे गोलंदाजीसाठी पर्याय कमी आहेत. जसप्रीत बुमराहने फक्त २ षटक गोलंदाजी केली आणि आता उर्वरित षटकांची जबाबदारी इतर गोलंदाजांवर आहे.
Jasprit Bumrah finishes a tight two-over spell

Jasprit Bumrah finishes a tight two-over spell

esakal

Updated on

India vs Pakistan Asia Cup 2025 Final Marathi News: भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये ८ फलंदाजांची फौज घेऊन मैदानावर उतरला आहे. हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून गोलंदाज अपेक्षित होता. पण, सूर्यकुमार यादवने प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकू सिंगचा समावेश करून घेतला. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का नक्की बसला होता, कारण भारताकडे गोलंदाजीचे पर्याय कमी झाले होते. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) हा एकमेव स्पेशालिस्ट जलदगती गोलंदाज संघात होता आणि त्याच्यासोबतीला शिवम दुबेने भार सांभाळला. पण, Death Overs मध्ये गोलंदाजीचा भार कोण सांभाळणार हा प्रश्न आता पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com