U19 Team India

U19 Team India

Sakal

U19 World Cup: विश्वविक्रमासह भारतीय संघ फायनलमध्ये! अफगाणिस्तानला नमवले, आता जेतेपदासाठी इंग्लंडशी भिडणार

India Into U19 World Cup 2026 Final: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्येचा पाठलाग करत भारताने उपांत्य फेरीत अफलागणिस्तानला पराभूत केले.
Published on

India qualify for U19 World Cup 2026 Final: १९ वर्षांखालील वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात जागा पक्की केली आहे. बुझवारी (४ फेब्रुवारी) हरारेमध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ७ विकेट्सने पराभूत करत १० व्यांदा अंतिम सामना गाठला आहे. भारताच्या विजयात ऍरॉन जॉर्जने (Aaron George) शतक करत मोलाचा वाटा उचलला.

आता सहाव्यांदा भारतीय संघ (Team India) विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल. अंतिम सामना शुक्रवारी (६ फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध होणार आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला उपांत्य सामन्यात पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

<div class="paragraphs"><p>U19 Team India</p></div>
U19 Team India: मी आहे काळजी नको... वैभव सूर्यवंशीचं सिक्स मारून अर्धशतक केल्यानंतर सूर्या स्टाईल सेलिब्रेशन; Video Viral
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com