

Vaibhav Suryavanshi Century
Sakal
Vaibhav Suryavanshi Fifty in U19 WC Semifinal: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतही १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. बुधवारी (४ फेब्रुवारी) हरारेमध्ये भारत आणि अफगाणिस्तान या युवा संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना होत आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर विक्रमी ३११ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभवने वादळी खेळ करत भारताला दमदार सुरुवात करून दिली.
खरंतर १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये (U19 World Cup) यापूर्वी एवढ्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग झालेला नाही. त्यामुळे भारताला अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी इतिहास घडवावा लागणार आहे. यासाठी वैभवने (Vaibhav Suryavanshi) भारताला दमदार सुरुवात करून दिली असून भारताचा डाव ऍरॉन जॉर्ज (Aaron George) आणि कर्णधार आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) यांनी पुढे नेला.