
U19 India vs Bangladesh Women: मलेशियामध्ये १९ वर्षांखालील महिला टी२० वर्ल्ड कप सुरू असून या स्पर्धेत भारताने रविवारी (२६ जानेवारी) सलग चौथ्या विजयाची नोंद केली.
१९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने रविवारी सुपर सिक्स फेरीत बांगलादेशच्या १९ वर्षांखालील महिला संघाला ८ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. भारताने अवघ्या ४३ चेंडूत विजयी लक्ष्य गाठलं.
या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर ६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारतीय संघाने ७.१ षटकात २ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. भारताचा हा या स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे. भारताने याआधी साखळी फेरीत तिन्ही सामन्यात विजय मिळवले होते.