

Grand Welcome for India U-19 Team in Mumbai
Sakal
Grand Welcome for India U-19 Team in Mumbai: शुक्रवारी (६ फेब्रुवारी) भारताच्या युवा संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून इतिहास रचला. हरारेमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडच्या युवा संघाला १०० धावांनी पराभूत केले आणि सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक (U19 World Cup) उंचावला.
या स्पर्धेतही १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) त्याची छाप पाडली. तो अंतिम सामन्यातील सामनावीर ठरला. तसेच त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही जिंकला. या विश्वविजयानंतर भारताया युवा संघ (U19 Team India) मायदेशात दाखल झाला आहे.