Navi Mumbai weather forecast for INDW vs SAW World Cup Final 2025
esakal
Navi Mumbai weather forecast for INDW vs SAW World Cup Final 2025: भारतीय महिला क्रिकेटसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणारा आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघाने उपांत्य फेरीत रेकॉर्ड ब्रेकिंग लक्ष्याचा पाठलाग करून बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाचे आत्मविश्वास खूपच वाढले आहे आणि आता जेतेपदाच्या ट्रॉफीसाठी त्यांना दक्षिण आफ्रिकेला पराभूत करायचे आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात पाऊस खोडा घालण्याचा अंदाज आहे.