

IPL 2026 | RCB vs KKR
Sakal
IPL 2026, RCB vs KKR, Marathi News: आयपीएलच्या प्लेऑफधील स्थान अधिकृतपणे निश्चित करण्यासाठी गतविजेत्या बंगळूर संघाला फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. सलग चार विजय मिळवून प्रगती करत असलेल्या कोलकता नाईट रायडर्स संघाच्या गोलंदाजीसमोर त्यांचा कस लागू शकतो. या दोन संघात आज (१३ मे) सामना होणार आहे.
बंगळूरचा संघ १४ गुणांसह कालपर्यंत पहिल्या स्थानावर होता, परंतु गुजरात आणि हैदराबाद यांच्यातील लढतीनंतर ते दुसऱ्या स्थानावर आले आहेत. प्रथम प्लेऑफ निश्चित केल्यानंतर क्वॉलिफायर-१ हा सामना खेळण्यासाठी त्यांचा प्रयत्न पहिल्या दोन स्थानात रहाण्याचा असेल.