ईशान किशनने आधी CSK फॅन्सना डिवचलं, पण सामन्यानंतर सांगितलं SRH ला जिंकण्यामागचं भावनिक कारण; म्हणाला, 'बहिणीचं निधन...'

Ishan Kishan on SRH beat CSK: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादला विजय मिळवून आयपीएल २०२६ प्लेऑफचं तिकीट मिळवून देण्यात ईशान किशनची मोलाचा भूमिका होती. या सामन्यानंतर त्याने CSK च्या चाहत्यांची खिल्ली उडवली. पण नंतर त्याच्या खेळीमागचे भावनिक कारणही सांगितले.
Ishan Kishan | CSK vs SRH | IPL 2026

Ishan Kishan | CSK vs SRH | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026 CSK vs SRH Marathi News: सोमवारी (१८ मे) चेन्नई सुपर किंग्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएल २०२६ स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबादचा हा ८ वा विजय होता, त्यामुळे त्यांनी १६ गुण मिळवले असून त्यांचे प्लेऑफचे तिकीट पक्के झाले. त्यांच्यासह त्यांनी गुजरात टायटन्सलाही प्लेऑफचं तिकीट मिळवून दिले आहे.

मात्र चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) हा पराभव महागात पडला. या पराभवामुळे त्यांच्या प्लेऑफच्या आशांना धक्का बसला आहे. हैदराबादच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने (Ishan Kishan) मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला. पण सामना जिंकल्यानंतर त्याने ज्याप्रकारचे हावभाव केले आणि जी प्रतिक्रिया दिली, त्याची चर्चा होत आहे.

Ishan Kishan | CSK vs SRH | IPL 2026
IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com