

Chennai Super Kings New Player
Sakal
Chennai Super Kings New Fielding Coach: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला सुरू होण्यासाठी आता केवळ १० दिवसांचा कालावधी राहिला आहे, त्यामुळे संघांची अंतिम तयारी सुरू झाली आहे. पाच वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्सने यापूर्वीच सरावाला सुरुवात केली आहे. त्यांच्या संघातील अनेक खेळाडू चेन्नईमध्ये असून सराव शिबिरात सहभागी झाले आहेत.
यादरम्यान आता चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) प्रशिक्षकही चेन्नईत दाखल झाले आहेत. याचदरम्यान चेन्नईने एका नव्या सदस्याचे स्वागत केले आहे.