

Jemimah Rodrigues, Laura Wolvaardt | DC Vs RCB WPL 2026 Final
Sakal
DC Set Record 204 Run Target for RCB: वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा (WPL) अंतिम सामना बडोद्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) संघात होत आहे. गुरुवारी होत असलेल्या या सामन्यात बंगळुरू दुसऱ्या विजयासाठी, तर दिल्ली तीन उपविजेतेपदांनंतर पहिल्या विजेतेपदाच्या हेतूने मैदानात उतरले आहेत.
या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी आक्रमक खेळताना बंगळुरूसमोर धावांचं २०४ धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं आहे. WPL स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील हे सर्वात मोठे लक्ष्य आहे. याशिवाय जर हे लक्ष्य बंगळुरूने पार केलं, तर हा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग असेल. या सामन्यात दिल्लीची कर्णधार जेमिमाह रोड्रिग्सने अर्धशतक ठोकले, तर चिनेल हेन्री आणि लॉरा वूल्फार्ट यांनीही वादळी खेळ केला.