

Joe Root - Harry Brook
Sakal
Joe Root & Harry Brook Century in Sri Lanka vs England: इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर मंगळवारी (२७ जानेवारी) खेळवला जात आहे.
या सामन्यात इंग्लंडसाठी आजी-माजी कर्णधार हॅरी ब्रुक (Harry Brook) आणि जो रुट (Joe Root) यांनी मैदान गाजवताना शतकी खेळी केल्या आहेत. रुटने मोठा विक्रमही केला आहे, तर ब्रुकने वादळी फलंदाजी केली.