

Kapil Dev Breaks Silence on Yograj Singh's Feud & Yuvraj's Apology
Sakal
Kapil Dev Sends Clear Message to Yograj Singh: युवराज सिंगचे वडील योगराज सिंग नेहमीच त्यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यांसाठी चर्चेत असतात. त्यांनी याआधी बऱ्याचदा भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव आणि एमएस धोनी यांच्याबाबत भाष्य केले आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानांबद्दल युवराजने काही दिवसांपूर्वीच माफीही मागितली होती. आता याबाबत कपिल देव यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर कपिल देव आणि योगराज सिंग हे एकेकाळचे मित्र होते. त्या दोघांनीही देश प्रेम आझाद यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते. हे दोघेही अष्टपैलू खेळाडू होते. नंतर दोघांनीही भारताचे प्रतिनिधित्वही केले.
पण कपिल देव भारताचे दिग्गज अष्टपैलू आणि विश्वविजेते कर्णधार बनले. त्यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ मध्ये पहिला वनडे वर्ल्ड कपही जिंकला होता. मात्र योगराज सिंग यांचे आंतरराष्ट्रीय कारकिर्द ६ वनडे आणि एका कसोटी सामन्यापूरती मर्यादीत राहिली. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात करियर केलं.