

Rishabh Pant
esakal
Will LSG Appoint a New Captain in 2027?: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ ची स्पर्धा लखनौ सुपर जायंट्ससाठी(LSG) फारशी चांगली ठरली नाही. या हंगामात लखनौ संघाचा खेळ अत्यंत खराब राहिला. रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने हंगामातील आपले सर्व १४ साखळी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांना केवळ ४ सामने जिंकण्यात यश आले, तर उर्वरित १० सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएल २०२६ च्या स्पर्धेतून प्लेऑफमधून बाहेर पडणारा लखनौ हा पहिला संघ ठरला.