

Krunal Pandya Help Axar Patel | IPL 2026
Sakal
शनिवारी (१८ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. चिन्नास्वामी स्टेडियमवर ६ सामन्यांनंतर पहिल्यांदाच बंगळुरूचा पराभव झाला. पण असे असले तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलला ज्याप्रकारे आधार देत खिलाडूवृत्ती दाखवली त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.