

Abhishek Sharma - Ishan Kishan
Sakal
ICC T20I Rankings: भारतीय संघासाठी इंग्लंड दौरा अत्यंत निराशाजनक सुरुवात झाली आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन टी२० मधील पराभवानंतर इंग्लंड दौऱ्यातही भारतीय संघ अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत आहे. इंग्लंडविरुद्ध सध्या ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे.
या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. पण नंतर मँचेस्टरमध्ये दुसऱ्या आणि ट्रेंट ब्रिजला झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवांना सामोरे जावे लागले होते. पण असे असले तरी अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या भारतीय खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीतील आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.