

Mohammed Shami's Advice to Youngster Vaibhav Sooryavanshi | Duleep Trophy 2026
Sakal
दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेचे (Duleep Trophy) विजेतेपद ईशान किशनच्या नेतृत्वातील पूर्व विभागाने जिंकला. तब्बल १३ वर्षांनंतर पूर्व विभागाने या प्रतिष्ठीत स्पर्धेते विजेतेपद मिळवले. चेन्नईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पूर्व विभागाने दक्षिण विभागाविरुद्ध पहिल्या डावात घेतलेल्या ३७२ धावांच्या आघाडीच्या जोरावर हे विजेतेपद जिंकले. सामना अनिर्णित राहिल्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजेतेपद दिले जाते.
दरम्यान, हे विक्रमी विजेतेपद मिळवल्यानंतर पूर्व विभागाकडू भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही (Mohammed Shami) सन्मान करण्यात आला. कारण त्याचा हा अंतिम सामना कारकिर्दीतील १०० वा प्रथम श्रेणी सामना होता.
यावेळी शमीने वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Sooryavanshi) वयापेक्षा मोठी कारकिर्द असल्याचं गमतीने म्हणत त्याला खास सल्लाही दिला. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.