

IPL 2026 | Mumbai Indians
Sakal
IPL 2026 Mumbai Indians news: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) रविवारी (१० मे) मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला. रायपूरला झालेल्या रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) मुंबई इंडियन्सला २ विकेट्सने पराभूत केले. हा मुंबई इंडियन्सचा आठवा पराभव होता.
मुंबईने आत्तापर्यंत ११ सामन्यांत खेळताना ३ विजय मिळवले असून ८ पराभव स्वीकारले आहेत. मुंबईचे सध्या ६ गुण आहेत. त्यांचे आता साखळी फेरीतील तीनच सामने उरले आहेत.
त्यामुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पुढचे तिन्ही सामने जिंकले, तरी जास्तीत जास्त १२ गुणांपर्यंतच पोहचू शकतात. मात्र यापूर्वीच ४ संघांनी १३ पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स अधिकृतरित्या प्लेऑफच्या (Playoffs) शर्यतीतून बाहेर (Eliminated) झाले आहेत.