

IPL 2026 | Mumbai Indians
Sakal
IPL 2026: रविवारी (१० मे) इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) रायपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात रोमांचक सामना झाला. शेवटच्या सामन्यापर्यंत रंगलेल्या या सामन्यात बंगळुरूने अवघ्या २ विकेट्सने विजय मिळवला.
बंगळुरूचा (RCB) हा ११ सामन्यांतील सातवा विजय होता. त्यामुळे बंगळुरूने १४ गुण मिळवत दमदार नेट रन रेटसह सध्या पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे. पण मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) स्पर्धेतील आव्हान मात्र संपले.