

MI vs KKR | IPL 2026
Sakal
MI vs KKR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन माजी चॅम्पियन्स संघात रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता मुंबईच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर सुरू होईल. या सामन्यातून दोन्ही संघ आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत.
मुंबई इंडियन्स सलग तिसऱ्यांदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार असून ६ व्या विजेतेपदाच्या हेतूने मैदानात उतरणार आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्स चौथ्या विजेतेपदाच्या हेतूने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहेत. मुंबई इंडियन्स २०१३ पासून कधीही पहिला सामना जिंकलेले नाहीत, त्यामुळे यंदा तो इतिहास मोडण्याचा प्रयत्न करतानाही ते दिसतील.