
पाकिस्तान वनडे संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या नेतृत्वात नुकतेच पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत ३-० अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अशातच आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तो निकालाची पर्वा नसल्याचे म्हणतोय आणि यामागील कारणही त्याने स्पष्ट केलंय. हा व्हिडिओ पाकिस्तान सुपर लीग २०२५ स्पर्धेला सुरुवात होण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेतील आहे.