Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तानी क्रिकेटपटूची दोन शब्दांची प्रतिक्रिया; आफ्रिदी, अख्तर, बाबर यांचे मौन

Pahalgam Terrorist Attack: Mohammad Hafeez Breaks Silence: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. माजी क्रिकेटपटू मोहम्मद हफीज यांनी आपल्या ट्विटरवर केवळ दोन शब्द लिहून या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली.
Mohammad Hafeez
Mohammad Hafeez esakal
Updated on: 

Mohammad Hafeez Reacts to Pahalgam Terror Attack

पहलगाम, जम्मू आणि काश्मीर येथील बायसरण मेडो येथे झालेल्या या हल्ल्यात किमान २८ नागरिकांचा मृत्यू झाला आणि २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. २०१९ च्या पुलवामा बॉम्बस्फोटानंतरचा हा सर्वात भयंकर हल्ला मानला जात आहे. हा हल्ला द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या लष्कर-ए-तयबाच्या समर्थक गटाने केल्याचा दावा केला जात आहे हल्लेखोरांनी भारतीय सैन्याच्या वेशात पर्यटकांना लक्ष्य केले, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com