Pakistan fans crossed all limits by abusing and mocking Indian U19 players including Vaibhav Suryavanshi
esakal
India vs Pakistan U19 controversy viral video: आशिया चषक ( १९ वर्षांखालील) स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानने बाजी मारली... भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा वातावरण तापतंच आणि याही सामन्यात तसे झाले.. पाकिस्तानी गोलंदाजांनी विनाकारण भारतीयांना डिवचले. आयुष म्हात्रे व वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Suryavanshi) यांनीही जशासतसे उत्तर देताना पाकिस्तानी खेळाडूंना त्यांची जागा दाखवली. पण, त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला अन् भारताला १९१ धावांनी हार पत्करावी लागली. यानंतर पाकिस्तानी फॅन्सचा माज वाढला आणि त्यांनी भारतीय खेळाडूंना अपमानास्पद वागणूक दिली.