

Yash Dayal
Sakal
RCB Yash Dayal Controversy: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे गतविजेते आता यंदाही विजेतेपद जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. पण याचदरम्यान या हंगामात बंगळुरूकडून वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) खेळला नाही.
तो संपूर्ण हंगामात संघासोबतच नव्हता. त्याने गेल्यावर्षी बंगळुरूला आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र या हंगामासाठी त्याला संघातून दूर करण्यात आले होते. याबाबत त्याने भाष्य केले आहे.