

Josh Hazlewood | IPL 2026 | RCB vs SRH
Sakal
RCB vs SRH Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा (IPL 2026) श्रीगणेशा आज (२८ मार्च) होत आहे. सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ घरच्या मैदानात सनरायझर्स हैदराबाद संघाला भिडणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे.
मात्र या सामन्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (Royal Challengers Bengaluru) मोठा धक्का बसला आहे. पहिल्याच सामन्याला त्यांचा हुकमी एक्का जोश हेजलवूड (Josh Hazlewood) मुकणार आहे. यामागचं कारण मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला स्पष्ट केले आहे.
हेजलवूड नुकताच दोन दिवसापूर्वी बंगळुरूत दाखल झाला आहे. गतवर्षी मिळवलेल्या विजेतेपदामध्ये तो बंगळूर संघाकडून सर्वाधिक विकेट मिळवणारा गोलंदाज ठरला होता. पण सध्या त्याच्या फिटनेसवर संघ व्यवस्थापन बारकाईने लक्ष ठेवून आहे, असं फ्लॉवर यांनी सांगितले.