
Rohit Sharma: भारतीय संघाने नुकतेच कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकली. या स्पर्धेनंतर रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा हे वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण रोहित शर्माने स्पर्धेनंतर पत्रकार परिषदेत कोणीही निवृत्त होत नसल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे हे तिघे कदाचित २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यता आहे. कारण रोहितने ही शक्यता नाकारलेलीही नाही. आता याबाबत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने त्याचे मत मांडले आहे.