Rishabh Pant India A captain vs South Africa A 2025
esakal
Rishabh Pant captain India A against South Africa A : यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंड दौऱ्यावर पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला क्रिकेटपासून तीन महिने दूर रहावे लागले होते. आगामी दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेपूर्वी चांगला सराव करता यावा यासाठी भारत अ विरुद्ध आफ्रिका अ यांच्यात चारदिवसीय सामन्यांचे आयोजन केले आहे. या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारत अ संघाचे नेतृत्व रिषभ ( Rishabh Pant ) कडे सोपवण्यात आले आहे.