
भारताचा क्रिकेटपटू रियान पराग इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे काही सामन्यात नेतृत्व केले होते. त्याने नियमित कर्णधार संजू सॅमसनला दुखापत असताना राजस्थानचा प्रभारी कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली.
त्याच्या नेतृत्वात खेळताना राजस्थानला ८ पैकी केवळ २ सामन्यात विजय मिळवता आला. राजस्थानला या स्पर्धेत ९ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान आता पुन्हा एकदा परागच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे. त्याला आसाम संघाचा कर्णधार करण्यात आले असून हा संघ परदेशी दौरा करणार असून ५ सामन्यांची वनडे मालिका खेळताना दिसणार आहे.