Rohit Sharma T20 WC 2024 : ....तर ते सर्व फेक आहे! विराटसोबत सलामीच्या वृत्तावर रोहित स्पष्टच बोलला

Rohit Sharma On Virat Kohli Opening In T20 WC 2024
Rohit Sharma On Virat Kohli Opening In T20 WC 2024esakal

Rohit Sharma On Virat Kohli Opening In T20 WC 2024 : रोहित शर्माने भारताच्या टी 20 वर्ल्डकपमधील प्लॅनिंगबद्दल येत असलेल्या वृत्तावर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आगामी टी 20 वर्ल्डकपमध्ये सलामीला येणार या वृत्ताला रोहित शर्माने काही दुजोरा दिला नाही.

रोहित शर्मा एका पॉडकास्टमध्ये म्हणाला की, 'आम्ही अजून भेटलेलो नाही. आम्ही वर्ल्डकपमध्ये कोण सलामीला येणार याबाबत काही ठरवलेलं नाही. सध्याच्या घडीला जोपर्यंत तुम्ही ही गोष्ट माझ्याकडून, राहुल भाई किंवा अजित भाईकडून ऐकली नाही तोपर्यंत ती माहिती फेक आहे.'

Rohit Sharma On Virat Kohli Opening In T20 WC 2024
CSK IPL 2024 : चालू आयपीएलमध्ये CSK च्या संघात मोठा बदल! 'या' स्टार खेळाडूची अचानक ताफ्यात एन्ट्री

सलामीवीर म्हणून रोहित अन् कोहलीच का?

आगामी टी 20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय संघाकडून सलामीला येतील असे अंदाज बांधले जात आहेत. भारतीय संघात शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल हे दोन सलामीवी आहेत. मात्र यशस्वी जयस्वालचा यंदाच्या आयपीएलमध्ये फारसा चांगला फॉर्म नाहीये. भारतीय संघाची ही मोठी डोकेदुखी आहे. शुभमन गिलने मात्र गुजरात कडून काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.

Rohit Sharma On Virat Kohli Opening In T20 WC 2024
PBKS vs MI IPL 2024 : पंजाब-मुंबईच्या सामन्यात कर्णधार खेळणार की नाही? दुखापतीबाबत कोचनं दिलं मोठं अपडेट

दुसरीकडे आयपीएलमध्ये सलामीला येणाऱ्या विराट कोहलीने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. त्याने 7 सामन्यात सध्या 361 धावा केल्या असून तो ऑरेंज कॅप होल्डर आहे. रोहित शर्माने 6 सामन्यात 261 धावा केल्या आहेत. तो या यादीत सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे हे दोघे भारतीय संघाकडून सलामीला येतील असा अंदाज बांधला जात आहे.

(Cricket News In Marathi)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com