PBKS vs MI IPL 2024 : पंजाब-मुंबईच्या सामन्यात कर्णधार खेळणार की नाही? दुखापतीबाबत कोचनं दिलं मोठं अपडेट

पंजाबचा कर्णधार शिखर धवन खांद्याच्या दुखापतीमुळे राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यातून बाहेर पडला होता.
Punjab Kings captain Shikhar Dhawan
Punjab Kings captain Shikhar Dhawan

PBKS vs MI IPL 2024 : पंजाबचा कर्णधार शिखर धवन खांद्याच्या दुखापतीमुळे राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यातून बाहेर पडला होता. आता आयपीएल 2024 मध्ये पंजाबचा सातवा सामना आज (18 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. पण शिखर धवन या सामन्यात पुनरागमन करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. आता पंजाबचे बॉलिंग कोच सुनील जोशी यांनी धवनच्या फिटनेसबाबत अपडेट दिले आहे. सुनील जोशी यांनी सांगितले की, खांद्याच्या दुखापतीनंतर धवनचे पुनर्वसन सुरू आहे.

Punjab Kings captain Shikhar Dhawan
IPL 2024 Points Table : दिल्लीच्या विजयाने प्ले-ऑफची शर्यत झाली रंजक! मुंबईसह 'या' संघांना बाहेर जाण्याचा खतरा

मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी जोशी म्हणाले की, सध्या धवन वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. टीम आम्हाला धवनबद्दल सतत अपडेट देत आहे. तो सध्या पुनर्वसनात असून त्याच्या अनुपस्थितीत करण संघाची जबाबदारी सांभाळत आहे. गेल्या वर्षीही धवनला दुखापत झाली होती, तेव्हा त्याच्या जागी करण कर्णधार होता आणि त्याने संघाचे नेतृत्व चांगले केले होते, त्यामुळे आम्हाला करणवर पूर्ण विश्वास आहे.

Punjab Kings captain Shikhar Dhawan
IPL 2024 GT vs RR : 'खेळपट्टीशी काहीही संबंध नाही...', लाजिरवाण्या पराभवानंतर गिलने या दोन खेळाडूंवर फोडलंं पराभवाचं खापर

पंजाब किंग्जचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी संकेत दिले होते की, धवन किमान सात ते 10 दिवस मैदानाबाहेर राहू शकतो. धवनच्या अनुपस्थितीत करन संघाची धुरा सांभाळेल, असेही त्याने सांगितले होते. गुरुवारी पंजाबचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. याशिवाय 21 एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात धवनचे खेळणेही साशंक आहे.

Punjab Kings captain Shikhar Dhawan
IPL 2024 Impact Player : 'इम्पॅक्ट प्लेअर' नियमामुळे अष्टपैलू खेळाडू मरतोय? अन् टीम इंडियाला बसतोय फटका

बराच काळ भारतीय संघाबाहेर असलेला धवन आयपीएलच्या चालू हंगामात फलंदाजीने प्रभावी कामगिरी करू शकला नसला. तरी तो पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. धवनने आयपीएल 2024 मध्ये पाच डावांमध्ये 125.61 च्या स्ट्राइक रेटने 152 धावा केल्या आहेत. आणि या हंगामात तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com