

Rohit Sharma | Virat Kohli | T20 World Cup 2024
Sakal
Rohit Sharma Recalls Heartfelt Embrace with Virat Kohli: भारतीय संघाने २०१३ नंतर बरीच वर्षे आयसीसी ट्रॉफीसाठी प्रतिक्षा केली होती. ही ११ वर्षांची प्रतिक्षा जून २०२४ मध्ये संपली होती, जेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताच्या टी२० संघाने वेस्ट इंडिजमध्ये झालेला टी२० वर्ल्ड कप जिंकला होता.
हा वर्ल्ड कप अत्यंत खास होता, कारण एकतर भारताने आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला होता आणि या वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या भारताच्या दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटला अलविदा केले होते.
हा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू अत्यंत भावुक झाले होते. ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यांवर रोहित आणि विराट (Virat Kohli) यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीचा क्षण तर प्रचंड चर्चेत राहिला होता. याबाबत आता रोहितनेच (Rohit Sharma) भाष्य केल आहे.